असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण!

Oct 18, 2019, 01:43 PM
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई व मुंबई उपनगरे, पुणे-पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर आणि मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा नुकताच स्टोरीटेलवर ‘निवडणूक रंग’ ह्या ५ भागांच्या सिरीजमधून आलेला आहे.
त्या निमित्ताने ‘मिडियानेक्स्ट’चे संचालक अभय कुलकर्णी यांच्याबरोबर उर्मिला निंबाळकर यांनी येत्या निवडणूकीच्या दृष्टीने तरूणाईच्या आणि एकंदर तमाम जनतेच्या दृष्टीने या निवडणूकीचा असलेला कल आणि त्यातून उभे राहिलेले राजकीय चित्रण याचे केलेले विश्लेषण आपल्या सहज ओघवत्या शैलीत मांडले आहे.
निवडणूकीला जाण्याअगोदर आणि आपले मत कुठल्याही पक्षाला देण्याअगोदर हा पॉडकास्ट ऐकणे अगदी जरूरी आहे. आणि त्याच बरोबर ‘निवडणूक रंग’ देखील ऐकणे तितकेच आवश्यक!

तर आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.

‘निवडणूक रंग’ ऐकण्यासाठी  येथे क्लिक करा.

स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.