हेमांगीची हटके ‘आर्टिफिशियल मॉम’

Nov 07, 2020, 06:50 AM
घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... ‘आर्टिफिशियल मॉम’ हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय... 

याशिवाय स्टोरीटेलने या आठवड्यात दिवाळीनिमित्त मौज ही दिवाळी अंक ऑडिओबुकच्या स्वरूपात आणला आहे, त्यासोबतच या आठवड्यात कोणती नवीन पुस्तकं आणि गोष्टी स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार याविषयी सांगत आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे.  त्यामुळे या दिवाळीत फराळासोबतच ऑडिओबुक्सची एक खुसखुशीत मेजवानी आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे... त्यामुळे ऐकायला विसरू नका हा खसा पॉडकास्ट...

आर्टिफिशियल मॉम  ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-artificial+mom

सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans