विनाशकाले : थरार क्राईम थ्रिलरचा...

Dec 12, 2020, 04:30 AM
अट्टल गुन्हेगारांनी एखादा गुन्हा तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, पण कल्पना करा एखादं भयंकर गुन्हा एखाद्या साध्या-सरळ माणसाच्या हातून घडला तर? आयुष्यात आलेल्या एका वाईट प्रसंगामुळे किंवा घटनेमुळे सभ्य माणूस निर्दयी कृत्य करतो, गुन्हा करतो आणि मग येतो विपरीत बुद्धीमुळे आलेला विनाशकाल! निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली 'विनाशकाले' अशाच काही अपरिचित गुन्ह्यांचा उलगडा करते. भारतीय दंडविधान कायद्याच्या कलमांनुसार वेगवेगळे गुन्हे घडतात आणि अभिनेता नचिकेत पूर्णपात्रेच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात रंगत जाते विनाशकाले ही क्राईम थ्रिलर... याच विनाशकालेमधील एक भाग आज आपण स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत.   

याशिवाय स्टोरीटेलवर या आठवड्यात काय काय ऐकायला मिळणार सांगितलं आहे प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांनी. त्यामुळे ऐकायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट...

'विनाशकाले' सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-vinashkale

सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans