स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!
Jan 09, 09:58 AM

See more options
Embed Code
स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑडिओबुकला आवाज देण्याचा तिचा अनुभव आणि स्टोरीटेलसोबतचा प्रवास स्वप्नालीने नुकताच पब्लिशर सई तांबेसोबत शेअर केलाय... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट ऐकायला अजिबात विसरू नका...
याशिवाय स्टोरीटेलवर २०२१ची सुरवात कशी झाली आणि या आठवड्यात श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!
याशिवाय स्टोरीटेलवर २०२१ची सुरवात कशी झाली आणि या आठवड्यात श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!